पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार


पिंपरी:
पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार….
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा दादू बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून ते थोडक्यात बचावले आहे. दुपार एक वाजता ही घटना घडली. चिंचवड रेल्वे स्टेशन जवळ हा गोळीबार झाला. गोळीबार करणाऱ्या तानाजी पवार याला पोलिसांनी घेतले ताब्यात आहे. या घटनेचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस त्यामागची कारणे शोधत आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारावरच गोळीबार झाल्याने तो शहरात चर्चेचा विषय ठरला. चिंचवड स्टेशन येथेच बनसोडे यांचे कार्य़ालय आहे.
नगरसेवक असल्यापासून ते सकाळी लोकांना भेटत असल्याचा त्यांचा उपक्रम आहे. त्यांच्या कार्यालयाजवळच या गोळ्या झाडण्यात आल्या. एकूण चार गोळ्या झाडल्याचे समजते आहे. त्या कोणालाही लागलेल्या नाहीत. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. हा पवार स्थानिक नागरिकच असल्याचे समजते आहे. घटना घडल्यानंतर अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
आरोपीने पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या आहेत.पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तूलातून गोळी झाडली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही घटना आज (बुधवारी, दि. 12) दुपारी एक वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली.तानाजी पवार असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे माहिती समोर येत आहे
.पोलीस तपास करीत आहेत. पिंपरीचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने पिस्तूलातून गोळी झाडली. मात्र या घटनेत कुणी जखमी झाले नाही. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून शस्त्र जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच या घटनेबाबतची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली असून, खळबळ उडाली आहे.