पुणे, पिंपरी-चिंचवड मधील मोक्कातील फरार 3 अट्टल गुन्हेगारांना सहकारनगर पोलिसांनकडून अटक…

पुणे ( प्रतिनिधी ) सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरावर सराईत चोरट्यांनी दरोडा टाकला होता. त्यानुसार पोलीस तपास करीत असताना मुख्य आरोपी ऋषीकेश गाडे याच्या टोळीने दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार 9 जणांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली होती
. त्यानंतर मुख्य आरोपीसह इतर साथीदार फरार झाले होते. याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम आरोपींचा शोध घेत होते.दोघा सराईतांचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या मोक्कातील फरार तीन अट्टल गुन्हेगारांना सहकारनगर पोलिसांनी अटक केले आहे.
त्यांच्याकडून दुचाकी, पालघन, नकली पिस्तूल असा 40 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ऋषीकेश उर्फ हुक्या श्रीकांत गाडे, स्वप्निल उर्फ पिट्या रतन पवार, ऋषीकेश सिद्धार्थ नंदुरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुख्य आरोपी गाडे याच्याविरूद्ध पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण हद्दीत तब्बल 32 गुन्हे दाखल आहेत
. इतर गुन्हेगारांविरूद्ध प्रत्येकी 5 गुन्हे दाखल आहेततपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे यांना आरोपी मुळशी आणि कोल्हापूरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत, दोन सराईतांचा खून करणार असल्याचे सांगितले
. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, बापू खुटवड, विजय मोरे, प्रकाश मरगजे, सतीष चव्हाण, संदीप ननवरे, भुजंग इंगळे, प्रदीप बेडीस्कर, महेश मंडलीक, किसन चव्हाण, शिवलाल शिंदे यांच्या पथकाने केली.