पुणे लसीकरणातील गोंधळ दूर करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र डॅशबोर्ड…

पुणे : पुणे महापालिकने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अॅण्ड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए) यांच्या सहकार्याने या डॅशबोर्डची निर्मिती के ली आहे. लसीकरणाची सर्व माहिती नागरिकांना https://www.punevaccination.in/ या संके तस्थळावर मिळणार आहे. या डॅशबोर्डचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गुरुवारी झाले
. उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेता गणेश बीडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, आयुक्त विक्रम कु मार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, एमसीसीआयचे प्रशांत गिरबाने या वेळी उपस्थित होते.करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने शहरात हाहाकार उडविला आहे. लसीकरणाचे फसलेले नियोजन आणि लसीकरण केंद्रांतील गर्दी तसेच गोंधळावरून टीके चे धनी व्हावे लागलेल्या महापालिके ला अखेर उशिरा का होईना जाग आली
. लसीकरणातील गोंधळ दूर करण्याच्या दृष्टीने महापालिके ने गुरुवारी स्वतंत्र डॅशबोर्ड कार्यान्वित के ला. डॅशबोर्डच्या माध्यमातून घरबसल्या माहिती मिळेल, असा दावा महापालिका करत असली तरी डॅशबोर्ड अद्ययावत ठेवून त्याच्यावर अचूक माहिती दिली जाणार का, या प्रश्नाचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळणार आहे.प्रतिबंधात्मक उपाययोजनाअंतर्गत शहरात ४५ वर्षांवरील तसेच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला
. त्यासाठी महापालिका रुग्णालये आणि खासगी अशी लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आली. मात्र या सर्व लसीकरणात के वळ गर्दी, गोंधळ आणि फसलेले नियोजनच दिसून आले. लसीकरणासाठी को-विन अॅप किं वा आरोग्य सेतू अॅपवर पूर्वनोंदणी के ल्यानंतरही नागरिकांना लसीकरण करता येऊ शकले नाही. नगरसेवकांनी लसीकरण केंद्रांचा ताबा घेऊन ‘टोकन’ पद्धत अवलंबण्यास सुरुवात के ली. त्यामुळे अनेक नागरिकांचे लसीकरणच होऊ शकले नाही. त्यातच लशींचा अपुरा पुरवठा होत असल्याने गोंधळातही भर पडली होती.
लसीकरणाचे फसलेले नियोजन, गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर अखेर महापालिके ने स्वतंत्र डॅशबोर्ड विकसित के ला. या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या एका क्लिकवर लसीकरणाशी संबंधित सर्व माहिती मिळेल, असा दावा महापालिके कडून करण्यात आला आहे. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाअंतर्गत महापालिके ने रुग्णशय्यांची माहिती मिळावी यासाठी रुग्णशय्या व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सुरू के ला आहे. मात्र नियंत्रण कक्षातून योग्य माहिती दिली जात नसल्याच्या तक्रारी आहेत.
मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीवेळीही महापालिके चे पितळ उघडे पडले होते. याशिवाय ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली जात असली तरी त्यावर माहिती अद्ययावत दिली जात नाही, नोंदी अचूक नसतात, असा अनुभव अनेक करोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना आला आहे. त्यामुळे लसीकरणासाठी डॅशबोर्ड कार्यान्वित के ला तर त्याचा प्रत्यक्षा लाभ होणार की डॅशबोर्ड निर्मिती के वळ पोकळ दावा ठरणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
डॅशबोर्डवर काय ?
नागरिकांनी डॅशबोर्डवर क्लिक के ल्यानंतर वयोगट, लशीचा प्रकार (कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड), मात्रेचा प्रकार (पहिली, दुसरी), लसीकरण केंद्र (सरकारी, खासगी) असे पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यातील पर्याय निवडल्यानंतर नागरिकांना शहरातील सर्व लसीकरण केंद्रांची माहिती मिळणार आहे. त्या लसीकरण केंद्रावर क्लिक के ल्यास त्या केंद्रावर लशीची कितवी मात्रा आणि कोणती लस दिली जाणार आहे, लशीचा किती साठा आहे, याची माहिती मिळणार आहे. दररोज संध्याकाळी लसीकरण केंद्रांसाठी दुसऱ्या दिवसासाठीची माहिती डॅशबोर्डवर दिली जाणार आहे. तसेच pmc:covid-19 vaccination Drive in Pune city या संके तस्थळावरही दुसऱ्या दिवसासाठी लशीच्या किती मात्रा आहेत, हे कळणार आहे.
लसीकरण केंद्रांतील गर्दी आणि गोंधळ दूर करण्यासाठी डॅशबोर्ड कार्यान्वित करण्यात आला आहे. या माध्यमातून नागरिकांना सहज माहिती उपलब्ध होणार असून गर्दी टाळता येणे शक्य होईल. लसीकरण प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी राज्य शासनाने तातडीने पुरेसा लस साठा उपलब्ध करून द्यावा.मुरलीधर मोहोळ, महापौर