खुनाच्या प्रयत्नात असलेले दोन आरोपीला सापळा रचून केली अटक खंडणी विरोधी पथकाचे यश


पुणे :: खंडणी विरोधी पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना तरूणाच्या खूनाच्या प्रयत्नातील आरोपी धायरीत येणार असल्याची माहिती पोलीस नाईक राजेंद्र लांडगे आणि नितीन रावळ यांना मिळाली होती त्या नुसार खूनाच्या प्रयत्नातील दोघा आरोपींना खंडणी विरोधी पथकाने एकने अटक केले आहे आरोपी . सोमनाथ नेताजी वाडकर (वय २७, पर्वती पायथा) आणि शुभम उर्फ प्रसाद रंगनाथ देशमाने (वय २२, रा. वडगाव बुद्रूक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत
.खंडणी विरोधी पथकाने धायरीत सापळा रचून सोमनाथ वाडकरला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार वडगाव बुद्रूक परिसरात असल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने शुभम देशमानेला ताब्यात घेतले.चौकशीत त्यांनी तरूणाचा खूनाचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, राजेंद्र लांडगे, नितीन कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, नितीन रावळ, विवेक जाधव, विजय कांबळे, संजय भापकर यांच्या पथकाने केली.