चाकण परिसरातील म्हाळुंगेत पाणी पुरवठा करण्याच्या वादातून तरूणाची हत्या

Crime-car-driver-assult

पुणे | एमआयडीसी चाकण परिसरातील म्हाळुंगे येथे कंपनीत पाणी पुरवठा करण्याच्या वादातून संबंधित अतुल भोसले तरूणाची हत्या करण्यात आली.म्हाळुंगे येथील ममता स्वीट दुकानासमोर दुपारच्या वेळी अतुल भोसलेला गाठून त्याच्यावर इतर साथीदारांच्या मदतीने कोयत्याने सपासप वार करून हत्या केली

अतुल भोसले हा एका कंपनीत दोन टँकरने पाणी पुुरवठा पुरवत होता. मात्र त्याला आरोपी अक्षय शिवलेने फोन करून मला त्या कंपनीला पाणी मी पुरवतो असं म्हणाला. यावरून त्यांच्यात बराच वाद झाला, अशी माहिती पोलीस अधिकारी अरविंद पवार यांनी दिली

आरोपींच्या हातातील शस्त्र पाहुन कोणीही मधे पडलं नाही. वार केल्यावर आरोपी पसार झाले. अतुल भोसले हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला त्यानंतर रूग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, या खूनाप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणामध्ये अक्षय शिवले, गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव आणि इतर तीन साथीदार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest News