पुण्यात फसवणूक करणारी महिला पोलिस निलंबित


पुणे ( प्रतिनिधी ) पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात लिपीक पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने विद्या साळवे यांनी तीन तरूणींकडून प्रत्येकी अडीच लाख मिळून साडेसात लाख रुपये घेतले होते. पैसे देउनही नोकरी मिळत नाही असे लक्षात आल्यानंतर तरूणींनी विद्या साळवे यांच्याकडे पैसे मागणीसाठी तगादा लावला होता.महानगरपालिकेत नोकरीच्या आमिषाने तरूणींची आर्थिक फसवणूक करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे
. विद्या दीपक साळवे (नेमणूक हडपसर पोलिस ठाणे) असे त्यांचे नाव आहे. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. संबंधित महिला कर्मचाऱ्याविरूद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.