टोळक्याचा बिबवेवाडीत राडा, वाहनांची तोडफोड

पुणे ( प्रतिनिधी ) रस्त्यालगत पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड करण्याचे सत्र सुरू आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी टोळक्याने बिबवेवाडीतील राजीव गांधीनगर परिसरात राडा घालून वाहनांची तोडफोड केली. टोळक्याने 5 रिक्षांसह 2 मोटारींचा तोडफोड केली आहे.शहरात मागील काही दिवसांपासून किरकोळ वाद, वैमनस्यातून दहशत करण्याच्या घटना वाढल्या आहेत.

पंढरीनाथ दारवटकर (वय 58, रा. राजीवगांधीनगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी राजू सावंत, राजेंद्र गोरड आणि साथीदार दोन दिवसांपूर्वी राजीवगांधीनगर परिसरातील दत्तमंदिर चाळीत रात्री साडेनऊच्या सुमारास गेले. त्यांनी संबंधित भागातील रहिवाशांना शिवीगाळ केली. हातातील काठ्या आणि सिमेंटचे गट्टू वाहनांवर फेकले. त्यामुळे 5 रिक्षा आणि 2 मोटारींचे नुकसान झाले आहे. त्यानंतर विचारपूस करण्यासाठी आलेल्या पंढरीनाथ दारवटकर यांच्यावर टोळक्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी वार हुकविल्याने जीव वाचला आहे.

याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे यांनी दिली आहे

. शहरात मागील काही दिवसांपासून किरकोळ वाद, वैमनस्यातून दहशत करण्याच्या घटना वाढल्या आहेत. याप्रकरणी रणजीत राजू सावंत (वय 19), आदेश राजेंद्र गोरड (वय 21, दोघे रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली.

 बिबवेवाडी येथे खून करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगार माधव वाघाटे: फिर्यादीनूसार ते शनिवारी रात्री मित्र सुनिल घाटे याच्याबरोबर रस्त्यावर बोलत उभे होते. यावेळी त्यांनी त्यांचा मित्र आनंद निवृत्ती कामठे याच्या वाढदिवसानिमीत्त व्हॉटसअपवर शुभेच्छा देणारा स्टेटस ठेवला होता. बिबवेवाडी येथे खून करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगार माधव वाघाटे व त्याच्या साथीदारांविरुध्द खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

. याप्रकरणी सावन गवळी (23,रा.बिबवेवाडी) याने फिर्याद दिली आहे. याचा राग मनात येऊन मयत माधव वाघाटे हा तेथे दाखल झाला. त्याने ‘ बघ आज तुझे तुकडे करायला माझी गॅंग आणली आहे.’ असे म्हणत हातातील लोखंडी कोयता सावन गवळीच्या डोक्‍यावर मारला. मात्र त्याने मार चुकविला.यानंतर त्याला बांबु व दगडांनी मारहाण करण्यात आली. यामध्ये सावन गवळी गंभीर जखमी झाला. दरम्यान यावेळी झालेल्या भांडणात माधव वाघाटे याच्यावर पेवर ब्लॉक व बांबूने हल्ला करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. यातील काही संशयीत आरोपींना अटकही करण्यात आली.

Latest News