पिंपरी चिंचवड महापालिकेकडील करोना प्रतिबंधक लस संपली…

las-a

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत 4 लाख 65 हजार 73 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये 45 वर्षांवरील 3 लाख 63 हजार 622 नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर 88 हजार 329 आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाइन वर्कर यांना करोनाची लस देण्यात आली

18 ते 44 वर्ष वयोगटातील फक्त 13 हजार 122 नागरिकांना लस देण्यात आली आहे.आतापर्यंत शहरातील अवघ्या 19 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणाला गती देण्याची आवश्‍यकता असतानाच लसींच्या तुटवड्यामुळे शहरातील लसीकरणावर मर्यादा येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडील करोना प्रतिबंधक लस संपली आहे

. अद्याप शासनाकडून महापालिका प्रशासनाला लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आजपासून शहरातील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाला लस मिळाली नसल्याने लसीकरणाला तूर्तास ब्रेक लागला आहे.आता लस संपली असल्याने आजपासून शहरातील सर्व लसीकरण बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.