पुणेकरांसाठी कोरोनाची लस देताना ठाकरे सराकरचा दुजाभाव- जगदीश मुळीक

PicsArt_05-18-06.02.07

पुणे : शहरातील सर्व नागरिकांना पुणे महापालिकेने कोरोनाची लस विनामूल्य उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी जागतिक स्तरावरील निविदांची प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी. मतदान केंद्रनिहाय लसीकरणाच्या केंद्रांची निर्मिती करण्यात यावी. खासगी रूग्णालयांमध्ये लसीकरण मोहिम राबविण्यासाठी आवश्यकतेनुसार शासनाशी संपर्क करून परवानगी द्यावी. याबाबत आयुक्तांशी चर्चा झाली.”पुणेकरांसाठी लस उपल्बध करून देताना राज्य सराकरने दुजाभाव केला तरी पुणे महापालिका पुणेकरांसठी लस उपलब्ध करून देईल

. कोरोनाची सद्यस्थिती, उपाययोजना, संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी नियोजन, शहरातील विकासकामे, सहयादीतील विकासकामे या संदर्भात मुळीक यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्यासोबत बैठक घेतली.यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुळीक म्हणाले, ”तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आवश्यक तयारी करण्यात येणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी सांगितले

.मुळीक म्हणाले, ” कोरोनाच्या तिसऱ्या‍या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सर्वप्रकारच्या आरोग्यविषयक उपाययोजना तातडीने कराव्यात. महापालिका कार्यक्षेत्रातील पाच विभागांमध्ये लहान मुलांवर उपचार करण्यासाठी प्रत्येकी किमान एक अतिदक्षता विभाग सुरू करण्यात यावा. कोविडचे रूग्ण बरे झाल्यानंतर त्यांना विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. तसेच मानसिक आरोग्य राखण्यासाठी समुपदेशनाची गरज असते. त्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्यात यावीत

. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेता महापालिकेच्या वतीने करण्यात येणार्‍या उपाययोजना जसे कोविड सेंटर, विलगीकरण कक्ष, बेड्‌सची संख्या, ऑक्सिजनयुक्त बेड्‌सची संख्या, व्हेंटिलेटरयुक्त बेड्‌स ऑक्सिजनची उपलब्धता, औषधे, उपकरणे, लसीकरण याबाबतच्या उपाययोजना करण्यात याव्यात.शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या उद्देशाने या वर्षीच्या महापालिका अंदाजपत्रकात नमूद केलेल्या सर्व आरोग्य विषयक योजना आणि प्रकल्पांच्या प्रशासकीय मान्यतेच्या प्रक्रियांना वेग देऊन आवश्यक असणारा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे या शैक्षणिक वर्षात शाळा कधी सुरू होतील याबाबत साशंकता आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता आगामी काळात ऑनलाईन वर्गांसाठी आवश्यक असणारी ई-लर्निंग यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे.या विषयांबाबत आयुक्त विक्रमकुमार यांच्याशी चर्चा केली.”

Latest News