पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द- RBI

shivaji-bank

पुणे : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. तसेच त्यांच्याकडे उत्पन्नाचे स्रोत नाहीत. त्यामुळे कायद्यानुसार ही बँक विविध निकषांची पूर्तता करु शकत नाही. यामुळेच बँक आपल्या ठेवीदारांना त्यांची संपूर्ण रक्कम परत करण्याच्या स्थितीत नाही. या पार्श्वभूमीवर ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने बँकेला व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी देता येत नाही. आर्थिक अनियमिततेसह इतर कारणांमुळे पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला आहे

. आर्थिक अनियमिततेसह अन्य कारणांवरून पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने (RBI) तात्काळ रद्द केला आहे. हीबँक लिक्विडेशन मध्ये काढल्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने जाहीर केला आहे. पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने पैसे थकवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सहकार विभागाने केलेल्या शिफारसीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक अनियमिततेसह अन्य कारणांवरून या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. सध्या ही बँक लिक्विडेशनमध्ये काढण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात आली आहे. विमा महामंडळाच्या कक्षेत येणाऱ्या बँकेच्या 98 टक्के ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळणार आहे,

या कारवाईमुळे बँकेतील 98 टक्के ठेवीदारांना त्यांची व्याजासह जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम परत मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी ओळखपत्रांसह (केवायसी प्रक्रियेनुसार आवश्यक) आपला दावा सादर करावा, असे सांगितले जात आहे. 

Latest News