पुण्यात जबरी चोरी करणाऱ्य़ा टोळीला अटक गुन्हे शाखेची कारवाई

पुणे… लोणीकंद परिसरात जबरी चोरीचा तपास गुन्हे शाखेचे पथक करीत होते. त्यावेळी संबंधित चोरी सराईत गुन्हेगार इशाप्पा पंदी याने साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती पोलिस शिपाई ऋषिकेश ताकवणे आणि ऋषिकेश व्यवहारे यांना मिळाली.आरोपी इशाप्पा केसनंद फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा दुसरा साथीदार प्रदीप उर्फ बाबू यालाही पोलिसांनी केसनंदमधून अटक केलीशहरातील लोणीकंद परिसरात जबरी चोरी करणाऱ्य़ा टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट सहाने अटक केले. .
आरोपींकडून मोटार, दुचाकी, चार मोबाईल, फ्रीज, शेगडी, ब्रॅण्डेड कपडे, असा मिळून 7 लाख 15 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. इशाप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पंदी, प्रदीप उर्फ बाबू यशवंत कोंढाळकर, ओंकार गुंजाळ, विजय राठोड, गणेश काळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पथकातील ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर यांच्या प्रयत्नांमुळे सराईतासह जबरी चोरी करणाऱ्य़ांचा भांडाफोड करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींनी साथीदार ओंकार, विजय आणि गणेश याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.
तिनही आरोपी केसनंद परिसरात गुन्हा करण्याची माहिती ऋषिकेश टिळेकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली. आरोपींनी चोरीच्या पैशांतून खरेदी केलेले कपडे, फ्रिज, शेगडी, मोबाईल, जप्त करण्यात आले आहेत. इशाप्पा पंदी आणि ओंकार गुंजाळ सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरूद्ध नगरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
सहाय्य्क पोलीस आयुक लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक गणेश माने, एपीआय नरेंद्र पाटील, मच्छिंद्र वाळके, सचिन पवार, शेखर काटे, प्रतीक लाहीगुडे, कानिफनाथ कारखिले, नितीन शिंदे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली.