पुण्यात लूटणाऱ्या टोळीला भारती विद्यापीठ पोलीसानी ठोकल्या बेड्या…

PicsArt_06-01-09.06.08

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वैभव गायकवाड, पोउपनि समाधान मचाले, आकाश फासगे, पोलीस मनोज बदडे यांनी गोकुळ नगर चौक येथे सापला लावला असता सदर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्नात असताना वरील स्टाफ यांनी शिताफीने पकडून त्यास अटक केली आहे दरोडा व रस्ता लूट करणाऱ्या आरोपींना भारती विद्यापीठ पोलीसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , 20 मे रोजी पहाटे साडेपाच वाजता जुना पुणे सातारा रोड हिल हॉटेलच्या समोर कात्रज येथे आरोपी उमेर असिफ अन्सारी ,नोमेंन अस्लम खान आशरफ आरिफ शेख , जैद जमीर दलाल व एक अनोळखी इसम हे दरोडा टाकण्याच्या व वाहनचालकांना अडून लुटण्याच्या तयारीत होते त्यांनी सोबत तलवारी ,मिरचीपूड दुचाकी गाड्या असे घेऊन घातक शस्त्र जवळ बाळगून वाहने चोरून नेण्याचा प्रयत्न केलेला होता.त्यापैकी अशरफ अन्सारी व त्याचा एक साथीदार सदर गुन्ह्यातून फरार झाले होते. आरोपीचा तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे अधिकारी करत होते.

त्यांना आरोपी गोकुळ नगर चौक येथे येणार असल्याची खात्रीशीर खबर पोलीस आकाश फासगे यांना मिळाली शेख हा आज गोकुळ नगर येथुन गावी पळून जाणार होता.

Latest News