पुण्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशयावरून खून


पुणे ::: पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊन तिचा गळा दाबून खून करून स्वतः गळफास केल्याची घटना पुण्यातील वडगावशेरी भागात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दररोज भांडण करणाऱ्या पतीने सोमवारी (३१ मे) रात्री टोकाचं पाऊल उचललं आणि त्याची दोन्ही मुलं पोरकी झाली.चारित्र्याच्या संशयाने पुण्यात एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे
. .उषा योगेश गायकवाड (वय २८) असं खून करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून, योगेश गायकवाड असं पत्नीचा खून करून आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.