पिंपरी चिंचवड मधील -ऑटो क्लस्टर जम्बो कोविड सेंटर बंद – आयुक्त राजेश पाटील

images-2021-05-09T013322.762

पिंपरी : करोनाबाधित रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने गेल्या वर्षी २०० खाटांची क्षमता असलेले हे करोना केंद्र महापालिकेने सुरू केले होते. त्या ठिकाणी शेकडो रुग्णांवर उपचारही करण्यात आले. काही दिवसांपासून शहरातील करोना रुग्णांची संख्या खालावत चालली आहे. या केंद्रात सध्या एकही रुग्ण दाखल नाही. त्यामुळे हे केंद्र बंद करणे आवश्यक आहे, असा निर्णय आयुक्तांनी घेतला……..

या ठिकाणी कार्यरत असलेले पालिकेचे अधिकारी, कर्मचारी पुढील आदेश येईपर्यंत त्याच ठिकाणी कार्यरत राहतील, असे आयुक्तांनी याबाबत काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.एकही करोनाबाधित रुग्ण दाखल नसल्याचे कारण देत चिंचवड-ऑटो क्लस्टर येथील मोठे करोना काळजी केंद्र (जम्बो कोविड सेंटर) बंद करण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी जाहीर केले

आयुक्तांच्या निर्णयाविरोधात येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. तथापि, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आल्याने त्यांनी आंदोलन सुरू केले आहे गरज सरो, वैद्य मरो’ असे धोरण पालिकेने कृतीतून दाखवून दिल्याचा आरोप करत येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या आवारात धरणे आंदोलन सुरू केले आहे.

पालिकेने हे केंद्र ‘स्पर्श’ या खासगी संस्थेला चालवण्यासाठी दिले होते. मात्र, त्यांच्या कारभारावरून होणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन पालिकेने त्यांचा ठेका रद्द केला. तेथे काम करणाऱ्या ४० डॉक्टरांसह जवळपास २०० कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात पालिकेने अधिग्रहित केले. करोना प्रादुर्भाव कायम असेपर्यंत त्यांना कामावर ठेवण्याची ग्वाही देतानाच पालिकेच्या परवानगीशिवाय नोकरी सोडता येणार नाही, असेही बजावण्यात आले होते. प्रत्यक्षात पालिकेनेच रुग्णालय बंद करून कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केले आहे.

Latest News