मराठा,ओबीसी, पदोन्नती या सर्व आरक्षणाला शरद पवारच जबाबदार – गोपीचंद पडळकर


पुणे ::+मराठा, ओबीसी आणि पदोन्नती या सर्व आरक्षणाला पवारच जबाबदार आहे. यांना फक्त मुलगी, पुतण्या, नातू आणि पै पाव्हण्यांचं पडलं आहे. या सरकारला बहुजन समाजाला उद्ध्वस्त करायचा आहे, असं सांगतानाच ओबीसी आरक्षण रद्द होण्यास हे सरकारच जबाबदार आहे. या सरकारने अजूनही मागासवर्गीय आयोग गठीत केला नाही. त्यामुळे या सरकारच्या विरोधात बहुजन समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आ गोपीचंद पडळकर यांनी दिला
सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही. आहे त्यांचं आरक्षणही ठेवायचं नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका घेतली जात आहे. आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. पवार सत्तेत होते, मुख्यमंत्री होते, तेव्हापासून आरक्षणाची मागणी होत आहे. पण मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं पवारांना कधीच वाटलं नाही. यावरून त्यांची भूमिका समजून येते, असं पडळकर म्हणाले.
राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत माहिती देत नाही, असं वकीलच सांगत होते. वकिलांनी कोर्टात सांगितलं. आम्ही तर बोललो नाही. महाराष्ट्र भाजप असो की केंद्र सरकार असो कुणीही हा आरोप केला नाही. हे वकिलाने कोर्टात सांगितलं. त्यामुळे सरकारची मानसिकता काय होती आणि आरक्षण कसं गेलं हे स्पष्ट होतं, असं ते म्हणाले.मराठा आरक्षणापाठोपाठ पदोन्नतीतील आरक्षणाचंही हेच झालं. या उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार आहेत. मुळात अजित पवार हे या समितीचे अध्यक्ष होऊच कसे शकतात? असा सवालही त्यांनी केला.
पवार अध्यक्ष असल्याने या समितीत बाकीचे कुणीही बोलूही शकत नाही. काँग्रसेला तर या समितीत कुत्रंही भीक घालत नाही, हे काय सांगायची गरज आहे का?