पुण्यात सलून, स्पा, जिम पुन्हा बंद राहणार – महापौर मुरलीधर मोहोळ


पुणे |कालपासून पुण्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर पुणे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार स्पा, सलून आणि जिम सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, राज्य सरकारच्या नियमावलीनुसार आता पुण्यातील स्पा, सलून आणि जिमही बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली
.महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव काही अंशी कमी झाला आहे. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये घट झाल्याचं दिसून येत आहे. मात्र राज्यातील काही शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत १५ जूनपर्यंत निर्बंधात वाढ करण्यात आली आहे.
.पुणे मनपा हद्दीत आपण निर्बंध शिथिल केले असले तरी राज्य सरकारच्या आदेशानुसार सलून, पार्लर, स्पा, जिम बंद ठेवण्यात येत आहे. सलून आणि पार्लर सुरु ठेवण्याचा निर्णय आपण स्थानिक पातळीवर घेतला होता.
आता ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करुन त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येतील, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
पुण्यात दुकाने ७ ते २ या वेळेत सूरु राहतील
अशात पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुण्यात सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याची घोषणा केली आहे. पुण्यात १ जूनपासून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व दुकान सुरू केली आहेत. सोमवारी ते शुक्रवार पर्यंत दुकान सुरू राहणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
काय बंद आणि काय सुरू राहणार?
- सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व दुकानांना परवानगी !
- पुणे मनपा हद्दीतील सर्व दुकाने उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु करण्यास परवानगी दिली असून शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. PMPML, हॉटेल्स, उद्याने, जिम आदी आस्थापना बंदच राहतील.
- पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने (Non-Essential Shops Stand alone shops and not inside Shopping Centers/Malls) सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
- रेस्टॉरंट व बार हे फक्त पार्सल/घरपोच सेवेसाठी दिनांक १४.०४.२०२१ च्या आदेशानुसार सुरु राहतील.
- पुणे महानगरपालिका क्षेत्रात ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू (Essential / Non-essential) यांची घरपोच सेवा (Home Delivery) सुरु करणेस मुभा राहील.
- पुणे महानगरपालिका क्षेत्रात दररोज दुपारी ०३.०० नंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण (valid reason) / अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णतः प्रतिबंध (संचारबंदी) राहील. तसेच घरपोच सेवा देण्यास यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार परवानगी असेल.
- पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक/कोरोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त ) २५% अधिकारी/कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील.
- कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
- पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
- पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस (Working days ) सुरु राहतील.