उरवडे आग प्रकरण : दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 तर केंद्राकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर

images-2021-06-07T231125.102

मुळशी येथील औद्योगिक परिसरातील ‘एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस’ या रासायनिक कंपनीला आज (सोमवार) दुपारी भीषण आग लागली. यामध्ये १८ कामगारांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये १५ महिला आहेत. तर १५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. १५ दिवसांपूर्वी देखील या कंपनीला आग लागल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिली.पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या उरवडे येथील कंपनीला लागलेल्या भीषण आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमी झालेल्यांना ५०,००० रुपयांची मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या घटनेची दखल घेतली असून मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वनं केलं आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच ही आग आटोक्यात आली असून, कुलिंग ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर आगीचे प्राथमिक कारण समजेल. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे समोर आल्यानंतर दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.सुत्रांच्या माहितीनुसार, या आगीत मंगल नागू आखाडे (खरावडे), सीमा बोराटे (बीड), संगीता गोंदे (मंचर), सुमन ढेबे (खरावडे), संगीता पोळेकर (घोटावडे फाटा), महादेवी अंबारे (सोलापूर), सारिका विलास कुदळे, सुरेखा तुपे (करमोळी) यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मंगल आखाडे यांचा कामाचा आजचा पहिला दिवस होता. हा पहिलाच दिवस दुर्देवाने आय़ुष्याचा शेवटचा दिवस ठरला. एसव्हीएस कंपनीत सॅनिटायझर तयार करण्याच काम सुरू होते. सॅनिटायझर बनविण्याचे काम सुरू असताना कंपनीला अचानक आग लागली.

Latest News