मालकांच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना, पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


पुणे :++ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय. मृतांमध्ये महिला कामगार अधिक आहेतमुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीची पाहणी करण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सकाळी दुर्घटनास्थळी आले होते. आगीत भस्मसात झालेल्या कंपनीची पाहणी केल्यानंतर वळसे-पाटील यांनी मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, रुपाली चाकणकर, संतोष मोहोळ यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी, एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी वळसे-पाटील यांनी अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची संपूर्ण माहिती घेतली.
दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्याचं सांगत एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी केली
. त्यानंतर या दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कंपनी मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निदर्शनास आलं.
या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केलीय. त्यानंतर कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड पोलीस ठाण्याते पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याचंही देशमुख यांनी सांगितलं.
आग कशामुळे लागली, याला जबाबदार कोण यासाठीच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त होईल. चौकशीचा प्राथमिक अहवाल प्राप्त होताच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल. त्यानंतर जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपाच्या सुमारास घडली. त्यानंतर हे सर्व मृतदेह ससून रुग्णालयात आणण्यात आले आहेत. त्यानंतर मृतांच्या नातेवाईक मध्यरात्रीपासून रुग्णालयात थांबून आहेत. मृतदेहांची ओळख पडवण्याचं काम अद्याप बाकी आहे. मात्र, रुग्णालयात दाखल झालेल्या नातेवाईकांपैकी कुणाचाही डीएनए घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मंत्र्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी जाण्यापेक्षा आमच्या भावना समजून घ्याव्यात, अशी प्रतिक्रिया नातेवाईक व्यक्त करत आहेत.
.