पहिले अतिक्रमण हटवा मगच व्यापा-यांवर निर्बंध घाला…..श्रीचंद आसवाणीपी

IMG-20210608-WA0215

1/ पी 2 प्रमाणे दुकाने सुरु ठेवण्यास व्यापा-यांचा विरोधव्यापारी प्रतिनिधी, पोलिस अधिकारी व मनपाच्या अधिका-यांचा पिंपरी कॅम्पमध्ये पाहणी दौरा

पिंपरी (दि. 8 जून 2021) लॉकडाऊन मुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. पार्किगच्या नियमांप्रमाणे (पी 1/ पी 2) दुकाने उघडी ठेऊन व्यापा-यांचे आणखी नुकसान होईल. ‘ब्रेक द चेन’ च्या नियमांनुसार सोमवार ते शुक्रवार दुपारी चार पर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे. पी 1 / पी 2 मुळे आठवड्यातून दोनच दिवस दुकाने सुरु ठेवावी लागतील, यास पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचा विरोध आहे अशी माहिती अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी दिली.

मंगळवारी (दि. 8 जून) श्रीचंद आसवाणी यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी नीरज चावला, प्रकाश रतनानी, सुनिल चुगाणी तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त मंचक हिप्पर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पिंपरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी पिंपरी कॅंम्प परिसरात पाहणी दौरा केला. यावेळी व्यापारी प्रतिनिधींनी आपल्या अडचणी सांगितल्या.

या भागातील अतिक्रमण, बेकायदेशीरपणे व्यवसाय करणारे पथारीवाले, फेरीवाले यांना प्रथम हटवा अशी व्यापा-यांनी मागणी केली. कोरोनाचे सर्व नियम पाळूनच व्यापारी दुकाने सुरु ठेवत आहेत. तरीही पोलिस आणि मनपाचे अधिकारी विनाकारकण दंडात्मक कारवाई करतात अशीही व्यापा-यांची तक्रार आहे. गर्दिच्या वेळी ग्राहकांना वाहने लावण्यास जागा मिळत नाही.

त्यामुळे वाहतुकीस अडथळा येतो. यासाठी साई चौकातील सबवेच्या पलीकडील मोकळ्या जागेचा वापर करता येईल का ? याबाबत अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी माहिती घेतली व पाहणी केली. कोरोनाच्या दुस-या लाटेवर बहुतांशी नियंत्रण मिळवण्यास यश आले असून लॉकडाऊन पुर्णता: उठवण्यासाठी आवश्यक ती दक्षता व्यापारी तसेच ग्राहकांनी देखिल घ्यावी व नियमांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन पिंपरी मर्चंन्ट फेरडेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी केले.—————————–

Latest News