आरक्षण विषयावरून काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत आक्रमक

PicsArt_06-11-08.54.10

मराठा समाजाच्या मागणीला आमचा पाठिंबाच आहे. पूर्वीच्या काळातील मराठ्यांची अवस्था व आताची अवस्था यात खूप फरक झालेला आहे. मराठा समाजातही गरीबी वाढली आहे. मुलांच्या शिक्षणाचेही प्रश्‍न आहेत. त्यामुळे त्यांनासुद्धा आरक्षणाच्या सवलती मिळाल्या पाहिजे, असं आमचं मत आहे. पण त्यांनी आम्हाला वेठीस धरू नये. आमचं भांड़वल करू नये. तेच काम करू शकतात व आम्ही काम करू शकत नाही, अशी भूमिकाही मराठ्यांनी घेऊ नये, असे राऊत म्हणाले.आरक्षण विषयावरून काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज आक्रमक भूमिका घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशीच आमचीही भूमिका आहे. मात्र, त्यांनीही मोठं मन दाखवलं पाहिजे. आमचं भांडवल करून स्वत:साठी त्यांनी लढू नये. अन्यथा आम्ही बांगड्या भरल्या नाहीत किंवा आम्ही भिकारीही नाही आहोत, असे राऊत म्हणालेराज्य सरकारनं 7 मे रोजी पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याची अधिसूचना काढली होती. मात्र, हा निर्णय घेताना मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणासाठी राज्य मंत्रिमंडळाने तयार केलेल्या उपसमितीला विश्वासात घेण्यात आलं नाही. त्यामुळं अनेकांनी रोष व्यक्त केला होता.पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याबाबतचा ७ मे रोजीचा राज्य सरकारचा जीआर रद्द झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असेही ते म्हणाले.

Latest News