पुण्यातील दुकाने रात्री 7 पर्यंत परवानगी -पालकमंत्री अजित पवार

PicsArt_06-11-09.03.32

पुणे | पुण्यात सोमवार पासून मॉल उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातील दुकाने रात्री 7 पर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंट आणि हॉटेल 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास सोमवारपासून परवानगी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. सोमवारी मॉल बाबत नियमावली जाहीर करण्यात येईल. या सर्वात मात्र कलाकारांच्या पदरी निराशाच पडली आहे. सिनेमा, नाट्यगृह बंद राहणार आहेत.कोरोनामुळे अनेक दिवस लॉकडाऊनमध्ये राहिलेल्या पुणे शहराला अखेर दिलासा मिळला आहे. पुणे शहरासाठीचे निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. अजित पवारांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. पुण्यातील पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या वर आहे. म्हणून पुण्यातील निर्बंध शिथील करण्यात येत असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहेपुढील दोन दिवस जर पॉझिटिव्हिटी 5 टक्क्यांचा आत राहिला तरच हा दिलासा दिला जाईल, असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. मागे पुणे महापालिका हद्दीमध्ये विकेंड लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय झाला होता. दरम्यान पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण मध्ये मात्र पॉझिटिव्हिटी कमी न झाल्यानं निर्बंध शिथील करणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान, कोरोनामुळे यंदाही वारीसाठी केवळ 10 पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. पालखीसोबत जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. अजित पवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पुण्यात आषाढी वारी संदर्भातल्या आढावा बैठकीत त्यानी या बाबत चर्चा केली आहे.

Latest News