PCMC: प्रभाग १३ मध्ये लोकमान्य टिळक चौक ते दुर्गानगर पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट अंतर्गत विकसित


निगडी | निगडी यमुनानगर प्रभाग १३ मध्ये लोकमान्य टिळक चौक ते दुर्गानगर पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट अंतर्गत विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. ११) रोजी महापौर माई ढोरे, भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नगरसेविका कमल घोलप, नगरसेविका सुमन पवळे, नगरसेवक उत्तम केंदळे तसेच मनसे गटनेते सचिन चिखले, पिंपरी चिंचवड शहर विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार, बापु घोलप, ज्येष्ठ नागरिक अण्णा अडी, अप्पा कुलकर्णी, विकास देशपांडे, भगवान श्राद्धे, गोरख कोलते, ए पी कुलकर्णी, शेखर आसरकर, गिरी देशमुख, आदित्य कुलकर्णी, प्रथमेश आंबेडकर, शिरीष जेधे, अनिल वाणी, प्रशांत बाराते, सारिका चव्हाण, विमल काळभोर, निलम गोलार, मकवाना ताई व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.नगरसेविका कमल घोलप म्हणाल्या, पिंपरी चिंचवड महापालिकेने अर्बन स्ट्रीट डिझाईन अंतर्गत पादचा-यांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील पदपथ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत पादचा-यांना चांगल्या सुविधा देण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने निगडी यमुनानगर प्रभाग १३ मध्येही ‘अर्बन स्ट्रीट’चा उपक्रम हाती घ्यावा. त्यामुळे प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, मॉर्निंगसाठी जाणारा वर्ग यांना रहदारीच्या त्रासापासून मुक्तता मिळेल. तसेच प्रभागाच रुपडं पालटेल, अशी मागणी प्रभागातील स्थानिक नगरसेवकांना बरोबर घेऊन पालिका प्रशासनाकडे केली होती. अखेरीस प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेतली. या महत्वकांशी प्रकल्पामुळे निगडीकडून येणारी व त्रिवेणीनगर मार्गे भोसरीकडे जाणारी वाहतुक सुरळीत होण्यास मदत होईल.
नगरसेवक उत्तम केंदळे म्हणाले, या आधुनिक रस्त्यांमुळे प्रभागातील लोकमान्य टिळक चौक ते दुर्गा नगर चौक वाहतुकीची कोंडी कमी होण्यास व पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. जेष्ठ नागरीक व विद्यार्थी यांच्यासाठी पदचारी मार्ग सुलभ होणार आहे. . या प्रकल्पामुळे निगडी व यमुनानगर प्रभागातील वैभवात भर पडेल. या मुख्य रस्त्याची लांबी १५३० मी व मुख्य रस्त्याची रुंदी २४.०० मी इतकी आहे. या कामासाठी पालिकेने १६ कोटी ५४ लाखांच्या खर्चाच्या निविदेला मंजूरी दिली आहे. या योजनेचे काम निखिल कंट्रक्शन हे १८ महिन्यांच्या आत मार्गी लावणार आहेत. यावेळी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.