”अटल प्रभाग आरोग्यालय योजना” राबवणार – महापौर उषा ढोरे


पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात “अटल प्रभाग आरोग्यालय योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांची मोफत बाह्य रुग्ण तपासणी तसेच त्यांना मोफत औषध वाटप केले जाणार आहे… संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक प्रभागातील नागरिकांची मोफत बाह्यरुग्ण तपासणी व औषधांचे वाटप केले जाणार आहे.प्रभाग क्रमांक 22, काळेवाडी येथे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आज (सोमवारी) या योजनेला सुरूवात करण्यात आली.
नगरसेविका नीता पाडाळे, सुनीता तापकीर, नगरसेवक सुरेश भोईर, डॉ. दिनेश फस्के, डॉ. विशाल पटेल आदी उपस्थित होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी प्रत्येक प्रभागात “अटल प्रभाग आरोग्यालय योजना” राबवण्यात येणार आहे
.
. प्रत्येक प्रभागात अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहेत.त्याचप्रमाणे किडनी ट्रान्सप्लांट, कॅन्सर, हृदयाचे आजार, लहान बालकांना असलेले विविध आजार, खुब्यावरील शस्त्रक्रिया, मणक्याची शस्त्रक्रिया यांसारख्या मोठ्या खर्चिक असणाऱ्या शस्त्रक्रिया सुद्धा मोफत केल्या जाणार आहेत.
प्रभागांमध्ये राबवण्यात येणारी “अटल प्रभाग आरोग्यालय योजना” ही वर्षभर मोफत राबवण्यात येणार आहे. कोरोना नियमांचे पालन करून ही योजना राबविली जाणार आहे