पुणे महापालिकेच्या कायदा,विधी विभागाच्या अधिकारी मंजुषा इधाटे यांना 50 हजाराची लाच घेताना ACB च्या जाळयात


पुणे : हस्तांतरण अधिकाराच्या मंजुरीसाठी विधी विभागाकडे गेला होता. यावेळी मंजुषा यांनी त्याची मंजुरी देण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्यानंतर विभागाने मंजुषा इधाटे यांना रंगेहाथ पकडण्यासाठी एक सापळा रचला. लाचलुचपत विभागाने रचलेल्या या सापळ्यात मंजुषा रंगेहाथ अडकल्या
पुणे महापालिकेतील मुख्य विधी अधिकाऱ्याच्या दालनात मंजुषा 50 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला रंगेहाथ सापडल्या. सध्या विभागाने मंजुषा यांना गजाआड केलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईनंतर पुणे महापालिकेत एकंच खळबळ उडाली आहे.
पुणे महानगरपालिकेत आज खळबळजनक प्रकार घडला आहे. पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी मंजुषा इधाटे यांना आज लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. यामुळे मंजुषा इधाटे यांना अटक करण्यात आली आहे. आज पुणे महापालिकेत या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मंजुषा इधाटे गेल्या काही वर्षांपासून पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी म्हणून काम पाहत होत्या. 15 दिवसांनंतर इधाटे निवृत्त होणार होत्या. मात्र, निवृत्त होण्याअगोदरच त्या लाच घेतल्याप्रकरणी गजाआड गेल्या आहेत