हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत चोरांना गुन्हे शाखे च्या युनिट दोन कडून अटक

हडपसर पोलीस स्टेशन च्या हद्दीतील सराईत चोरांना गुन्हे शाखेकडून अटक
पुणे : हडपसर पोलीस स्टेशन च्या हद्दीतील सराईत चोरांना गुन्हे शाखे च्या युनिट दोन कडून अटक करण्यात आली आहे
आरोपी ससानेनगर रेल्वे फाटकाजवळ अॅक्टीव्हा दुचाकी सह थांबलेले असल्याची माहिती पोलीस कर्मचारी यांना बातमीदारकडून समजली त्या नुसार त्याच्यावर सापळा रचून त्यांना स्टॉफच्या मदतीने ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्याचे नावे १ ) संजय ऊर्फ सोन्या हरिप भोसले.वय -२१ वर्षे , रा – हांडेवाडी हडपसर , पुणे व २ ) पुरषोत्तम ऊर्फ बंडया राजेंद्र वीर , वय -२५ वर्षे , रा – नांदेडफाटा , सिंहगड रोड , पुणे अशी असल्याचे सांगितली
. त्याचेकडे अधिक तपास करता त्यांचेकडे १ ) हडपसर पोस्टे गुरनं .४२९ / २१ भादवि कलम ३९२,३४१.५०६.३४ आर्म अॅक्ट कलम ४ ( २५ ) , २ ) सिंहगड पोस्टे गुरनं .२३८ २०२१ भादवि कलम ३७९ , ३ ) सहकारनगर पोस्टे गुरनं . १४४/२०२१ भादवि कलम ३८०.३४ ( ज्वेलर्स दुकानातील चौरी ) असे गुन्हे उघडकीस आले .
त्यांचेकडे तपास करुन वरील ३ गुन्हे उघडकीस आणुन त्यांचेकडुन ७१,३०० / -रु किमतीचा मुद्देमाल त्यात १ सोन्याची चेन , त्याचे ताब्यात एक अॅक्टीव्हा गाडी मिळुन आली त्याबाबत विचारणा केली असता ते समाधानकारक माहीती देऊ न शकल्याने त्याने ती कोठूनतरी चोरुन आणले असल्या बाबत संशय आल्याने नमुद ईसमास अटक करुन आरोपी हे अभिलेखावरील दरोडा , जबरी चोरी , वाहन चोरी , घरफोडी करणारे गुन्हेगार आहेत .
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त श्री अशोक मोराळे .पोलीस उप आयुक्त श्री श्रीनिवास घाडगे सहा पोलीस आयुक्त श्री सुरेंद्रनाथ देशमुख पो.निरी , श्री महेंद्र जगताप युनिट -२ गुन्हे शाखा पुणे शहर . यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरी . प्रकाश मोरे , सहा.पो.निरी . वैशाली भोसले , सहा.पोलीस फौजदार यशवंत आंबे , सलीम पठाण य पोलीस अमलदार अस्लम पठाण , किशोर वग्गु , चेतन गोरे . उत्तम तारु , चंद्रकांत महाजन
आहे .