पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी फेब्रुवारी 2022 मध्येच


पिंपरी चिंचवड: निवडणुका सहा महिने पुढे ढकलणार यामुळे अनेक इच्छुक संभ्रमात होते. मात्र निवडणुक आयोगाने मतदार याद्या नुतणीकरणाचा कार्यक्रम हाती घेतल्याने निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्येच होणार हे स्पष्ट झाले आहे.राज्याच्या मुख्य निवडणुक आयुक्तांनी पत्र क्र.ईएलआर 2020/प्र.क्र.395/20/33नुसार मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे आदेश दिले असून, या पत्रानुसार मा. दिल्हाधिकारी पुणे यांनी पत्र क्र.पीईई-3-430/2021दि.16/06/2021 अन्वये या मतदार याद्यांचे विशेष पुनरिक्षणाचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात मतदार नोंदणी अधिकारी 206 पिंपरी (अ.जा)विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकार यांनी आज पत्रक प्रसिध्द केले आहे.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी फेब्रुवारी 2022 मध्येच सुरु होणार आहे. राज्य निवडणुक आयोगाने शहरातील मतदार याद्या नुतनीकरणाच्या कामास सुरुवात केली आहे. मतदार याद्यांचे अद्ययावतीकऱणाचा कार्यक्रम जाहीर कऱण्यात आला आहे. या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी विधानसभा मतदार संघातील एकूण 399 यादी भागातील 18256 मतदारांची छायाचित्रे यादीमध्ये दिसून येत नाहीत. ज्यांची छायाचित्रे यादीमध्ये नाहीत ,अशा मतदारांनी आठ दिवसांच आपली छायाचित्रे 206 पिंपरी विधानसभा मतदार संघ कार्यालय हेडगेवार भवन , से.क्र 26 प्राधिकरण निगडी येथे रहिवाशी पुराव्यासह जमा करायची आहेत. ज्यांची छायाचित्रे मुदतीत जमा होणार वाहीत, अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.या मतदार याद्या मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संकेतस्थलावर पाहण्यासाठी उपलब्ध असल्याचेही या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.