संभाजीराजे काही ना काही करत राहतील, पण 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती

PicsArt_06-16-11.07.37

मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. समाजाने हा विषय दिल्लीपर्यंत ठामपणे नेला पाहिजे. संभाजीराजे काही ना काही करत राहतील, पण एकावर जबाबदारी शक्य नाही. तुमचं सहकार्य लाभेल. सर्व 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी असं खासदार संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटलं आहे हा विषय पंतप्रधानांपर्यंत न्यायला हवा. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भाजप खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वात कोल्हापुरमध्ये पहिलं मराठा क्रांती मूक आंदोलन पार पाडलं. पाऊस असतानाही आंदोलनाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी आपलं व्यक्त करताना 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी, असं मत व्यक्त केलं आहे.पंतप्रधान सकारात्मक असल्याचं सांगण्यात आलं असलं तर अद्याप त्यांचे विचार काय आहेत हे कळालेलं नाही. ते स्पष्ट झालं तर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात येईल. बहुमत असलं तर त्यांच्याकडे जाऊन येण्यासाठी विनंती केली पाहिजे, असा सल्लाही छत्रपती शाहू महाराज यांनी दिला.

दरम्यान,महाराष्ट्राने एकत्र येऊन आमदार, खासदारांनी हा विषय दिल्लीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तो कसा न्यायचा यावर विचार केला पाहिजे. संभाजीराजेंना दिल्लीत पोहोचवण्यासाठी सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. बहुमतासाठी लॉबिंग करावं लागणार असल्याचं शाहू महाराज म्हणाले.

Latest News