महाराष्ट्र सरकार कडून मराठा आरक्षण, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल


मुंबई ::+मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्यासह अनेक मराठा संघटना आक्रमक झाल्या असून राज्यात दोन जिल्ह्यांमध्ये मराठा मोर्चे काढण्यात आले आहेत. संभाजी राजे यांनी विषय लावून धरल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका आज अखेर दाखल केली आहे
खासदार संभाजी राजे मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्य सराकरला एक महिन्याचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असंही म्हटलं होतं.
त्यांनी आपल्या मागण्यांमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला आज यश आलं आहे.
आरक्षणाबाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केली होती. ती मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली. माझ्या मागणीनुसार या याचिकेमध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरीत अॅनेक्शर्स देखील भाषांतरीत करण्यात येतील, असे नमूद केले आहे, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली
कोल्हापूरमध्ये झालेल्या मोर्चात संभाजी राजे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सात मागण्या केल्या होत्या. त्यात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या मागणीचा समावेश होता.