राजकीय वापरासाठी चौकशा केल्या जातात, – पृथ्वीराज चव्हाण


मुंबई : भाजपच्या काळात राजकीय वातावरण तापलं की प्रकरणं बाहेर काढली जातात. पण ही प्रकरणं दाबली जातात की आणखी काय होतं ते कळत नाही. सर्व प्रकरणे तात्पुरती बाहेर काढली जातात. राजकीय वापरासाठी चौकशा केल्या जातात, असं सांगतानाच सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. यावरून भाजपचे नेते टीका करत असतात. याच पार्श्वभूूमीवर बोलताना काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले पाच वर्षात तुम्ही काय दिवे लावलेत हे चंद्रकांत पाटलांनी सांगावं .
महाविकास आघाडीमधील सरकारमधील दोन नेत्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. यामध्ये आधी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. केंद्र सरकारच्या संस्था या स्वायत्त संस्था आहे.
. सीबीआयकडे एक हजार खटले प्रलंबित आहेत, असं सांगतानाच सत्ता गेल्यावरच भाजपला सर्व प्रकरणे आठवू लागतात, असा टोला चव्हाणा यांनी हाणला आहे. यावेळी बोलताना त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान, विधासभेचं अध्यक्षपद काँग्रेसलाच मिळणार हे निश्चित आहे. फक्त उमेदवार कोण असेल हे पक्षश्रेष्ठी ठरवेल, असं म्हणत पृथ्वीराज यांनी निवडणूक 6 तारखेला होणार की कधी हे सांगणं अवघड असल्याचं सांगितलं.