अभिनेता दिलीप कुमार यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन…

मुंबई : मुंबईत काम नसल्याने आणि कुटूंबियांशी झालेल्या वादामुळे दिलीपकुमार पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात ते ब्रिटीश आर्मीच्या कॅन्टीनमध्ये सहाय्यक म्हणून काम करायचे. या नोकरीसाठी त्यांना महिन्याकाठी पगार म्हणून फक्त 36 रुपये मिळायचे. ट्रॅजेडी किंग’ या नावाने प्रसिद्ध अभिनेता यांचे बुधवारी (7 जुलै) सकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले

दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी पेशावर येथे झाला होता. त्यावेळी हा प्रदेश भारतात होता. दिलीपकुमार यांची एकूण 12 भावंडे होती आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही अत्यंत वाईट होती. दिलीप कुमार यांचे वडील कामाच्या शोधात पेशावरहून मुंबईला आले होते.

. दिलीपकुमार हे 98 वर्षांचे होते आणि बर्‍याच दिवसांपासून ते आजारीही होते. 65हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे दिलीप कुमार मनोरंजन विश्वात प्रसिद्ध होण्यापूर्वी अत्यंत गरीब कुटुंबातील होते. दिलीपकुमार यांचे बालपण अत्यंत निकृष्ट स्थितीत व्यतीत झाले होते आणि त्यांना कॅन्टीनमध्ये काम करून उदरनिर्वाह करावा लागला होता

65हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या दिलीप कुमार यांनी या कॅन्टीनमध्ये काम करत असताना आपले सँडविच काउंटर उघडले. त्यांचे सँडविच ब्रिटीश सैनिकांमध्ये खूप लोकप्रिय होते. तथापि, या कामादरम्यान त्यांनी ब्रिटीश सैनिकांसमोर भारताच्या स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती

, त्यानंतर त्यांचे काम थांबले आणि त्यांना तुरुंगात जावे लागले. सुटकेनंतर ते मुंबईत आले आणि आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करण्यास सुरुवात केली. दिलीपकुमार यांनीही उशी विक्रीचे कामही केले होते, पण तेही यशस्वी झाले नाही.

म्हणून नावच बदलले!

सर्वांना ठाऊक आहे की दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान होते, परंतु हे का बदलण्यात आले याची कथा फारच थोड्या लोकांना माहिती आहे. बॉम्बे टॉकीजची मालक देविका राणी यांनी दिलीपकुमार यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर दिली, पण त्यांच्या वडिलांना हे अजिबात पटले नाही. म्हणूनच वडिलांच्या भीतीमुळे त्यांनी आपले नाव बदलले. देविका राणी यांनी त्यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.

Latest News