57 मुलींना लग्नाचे आमिष दाखवून 57 लाखाला गंडा घालणारा औरंगाबादचा आरोपी पुण्यात जेरबंद


पुणे : लग्नाचं आमिष दाखवायचं आणि त्यांच्या नात्यातील तरुणांना दाखवून लुटायचं. तब्बल 57 जणींना गंडा घालणाऱ्या ‘दादल्या’ला पुण्यातील बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने चार जणींसोबत घरोबा करुन आर्थिक लूट केल्याचे, तर तब्बल 53 तरुणींशी लग्नाचे आमिष दाखवून बोलणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे
योगेश दत्तू गायकवाड (रा. कन्नड, संभाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका तरुणीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. फिर्यादी तरुणी मूळची आळंदी देवाची येथे राहते
. जानेवारी 2020 मध्ये आईच्या उपचारासाठी बिबवेवाडीतील एका रुग्णालयात ती गेली होती. त्यावेळी परिसरातील स्थानकावर बसची वाट पाहत असताना आरोपी योगेशचे आधारकार्ड तरुणीला सापडले. तरुणीने आवाज देत योगेशला आधार कार्ड दिले. सोशल मीडियाद्वारे तरुणींना भुरळ पाडून ओळख वाढवायची, त्यांना
.त्यानंतर आरोपीने फिर्यादी तरुणी आणि तिच्या आईसोबत ओळख वाढवली.
लष्करामध्ये असल्याचे खोटे ओळखपत्र दाखवून तरुणीच्या आईचा विश्वास संपादित केला.आरोपीने तरुणीसोबत खोटे लग्न करून तिच्या भावाला लष्करात भरती करण्यासाठी 2 लाख रुपये घेतले
. त्यानंतर तरुणीच्या गावातील तरुणांचाही विश्वास मिळवला.योगेशने आतापर्यंत 53 तरुणींसोबत ओळख वाढवून प्रत्येकी एक लाख रुपये, याप्रमाणे 53 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्याला सापळा रचून अटक करण्यात पोलिसांना यश आलं.