झाडांना सन्मान देऊन खासदार वंदना चव्हाण यांचा वाढदिवस साजरा


खासदार वंदना चव्हाण या पर्यावरणप्रेमी म्हणून ओळखाल्या जातात. ‘हवामान बदल’ या विषयावर त्यांनी ५०० च्या वर व्याख्याने दिली आहेत. अशा पर्यावरणप्रेमी खासदारांचा वाढदिवस राष्ट्रवादी अर्बन सेलतर्फे झाडांना सन्मान देऊन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी अर्बन सेलचे ‘पर्यावरण’ समिती समन्वयक निलेश पुजारी आणि त्यांच्या टीमने नाशिक फाटा रोडवरील काही झाडांना बॅनरमुक्त आणि खिळेमुक्त केले. यावेळी निलेश पुजारी म्हणाले कि झाडांवर फुकट जाहिरात करून अनेकजण महानगरपालिकेचा महसूल बुडवत आहेत.
पालिकासुद्धा यावर कारवाई करत नाही. झाडे सजीव आहेत आणि झाडांचा असा गैरवापर म्हणजे झाडांचा अपमानच होय. म्हणून अर्बन सेलच्या पर्यावरण समितीतर्फे खासदार वंदना चव्हाण यांच्या वाढदिवशी हि मोहीम सुरु करण्यात आली. यावेळी कविता खराडे, मुकेश खनके, विलास वाघमारे उपस्तिथ होते.
राष्ट्रवादी अर्बन सेलचे अध्यक्ष माधव पाटील यांनी ‘अंघोळीची गोळी’ संस्थेमार्फत गेली ४ वर्षे झाडांना सन्मान देण्याची मोहीम सुरु ठेवली आहे. राष्ट्रवादी अर्बन सेलतर्फे झाडांना सन्मान देण्याचा हा उपक्रम संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरभर सुरु करणार असल्याचे निलेश पुजारी यांनी यावेळी सांगितले.