केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं, कुणाला थांबवायचं अधिकार मोदीनांचा-उपमुख्यमंत्री अजित पवार


पुणे |
राज्याच्या मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं आणि कुणाला थांबवायचं हा पंतप्रधानांचा अधिकार आहे. या गोष्टीमध्ये आम्ही बाहेरच्यांनी लुडबूड करायची गरज नाही केंद्रातील या मंत्रिमंडळ विस्तारावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात एकूण 43 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून चार नेत्यांना संधी देण्यात आली आहे. , राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला आहे
. सर्वात आधी नारायण राणे यांंनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 43 नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महाराष्ट्रातील नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि डॉ. भागवत कराड यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात सामावेश करण्यात आला आहे.तसेच नरेंद्र मोदींकडे बघून सर्व खासदार निवडून आलेत. मोदी देशाचे पंतप्रधान होणार म्हणून जनतेने या लोकांना निवडून दिलं आहे, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.