भाजपला मला संपवायचं आहे,असं मला वाटत नाही – पंकजा मुंडे


मुंबई : भाजपला मला संपवायचं आहे, असं मला वाटत नाही. मला वाटत नाही की मी एवढी मोठी आहे की मला संपवण्यासाठी अगदी पंतप्रधानापासून कामाला लागतील, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे पंकजा मुंडे यांचं राजकारण भाजपला संपवायचं आहे, असा आरोप शिवसेनेने केला होता. यावर पंकजा मुंडे आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मोदींच्या मंत्रिमंडळात 43 नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक मंत्र्यांना पदमुक्त करण्यात आलं तर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने प्रीतम मुंडे यांच्यासह पंकजा मुंडेही नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
मला वाटत नाही. मी अग्रलेख वाचला नाही. त्यामुळे त्यावर बोलणार नाही, असं सांगतानाच राजकारणात व्यवसाय म्हणून आले नाही. मी व्रत म्हणून मी आले आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. पत्रकार परिषद घेत त्यांनी सर्व चर्चांणा पुर्णविराम दिला.दरम्यान, मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या. आम्ही कधीच मंत्रिपदाची मागणी केली नव्हती. भाजपच्या कोणत्याही निर्णयावर आम्हाला आक्षेप नसल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं.