राजगुरुनगर मधील कुख्यात गुंड राहुल उर्फ पप्पू वाडेकर याचा डोक्यात दगड घालून खून

पुणे, :. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील कुख्यात गुंड राहुल उर्फ पप्पू वाडेकर याचा राजगुरुनगर पाबळ रस्त्यावर डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यामुळे राजगुरुनगर शहरात गँगवारचे टोळीयुद्ध पुन्हा उफाळले असल्याचे बोलले जात आहे. जुन्या गुन्हेगारीच्या वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

राहुल वाडेकर हा गेल्या काही दिवसांपासून तडीपार होता. रविवारी मध्यरात्री तो राजगुरुनगर शहरात प्रवेश करताना मध्यरात्रीच्या सुमारास त्याची हत्या करण्यात आली. मागील काही दिवसात गुंड पप्पू वाडेकर याने पुणे जिल्ह्यात दहशत पसरवली होती.

राजगुरुनगरमधील एका हॉटेलमध्ये खंडणी मागून खुनी हल्ला केल्याचा राग होता. या रागातून गुंड पप्पू वाडेकर याचा मालक मिलिंद जगदाळे व त्याच्या अन्य पाच साथीदारांनी पप्पूचा काटा काढण्याचा अंदाज पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी वर्तवला आहे

विविध प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी असलेला तडीपार गुंड पप्पू कल्याण वाडेकर अवघ्या 28 वर्षाचा होता. राजगुरुनगर येथील एका हॉटेलमध्ये खंडणी मागून खुनी हल्ला केल्याच्या रागातून मालक मिलिंद जगदाळे व त्याच्या अन्य पाच साथीदारांनी पप्पू चा काटा काढला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला

पप्पू वाडेकरवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि खंडणी असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. टोळीचा म्होरक्या म्हणून त्याच्या विरोधात पोलिसांनी शिफारस केल्यानुसार त्याला खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यात सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले होते.

रविवारी दिनांक 11 जुलै रोजी तो आपल्या लहान मुलीला भेटायला राजगुरुनगर परिसरात आला होता. संशयित आरोपी व त्याच्यात दोनदा जोरदार भांडणे झाली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी समेट सुद्धा झाल्याची चर्चा आहे. पण रविवारी त्याला राजगुरुनगर येथील पाबळ रोड परिसरात आरोपींनी गाठले व ठार केले. वाडेकरवर धारदार हत्याराने वार केले मग डोक्यात दगड डोक्यात घालून त्याचा खून केला आहे

. या प्रकरणाचा राजगुरूनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव अधिक तपास करत आहेत. या संपूर्ण घटनेने खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे आणि पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

Latest News