चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला तीन वर्षांनी बेड्या…

पिंपरी :इयत्ता दुसरी मध्ये शिकत असलेल्या एका सात वर्षांच्या चिमुकलीचे राजकुमार याने २४ सप्टेंबर २०१८ रोजी अपहरण केले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. २७ सप्टेंबर रोजी सकाळी बाराच्या सुमारास पिंपरी मधील एच ए मैदानाच्या एका कोपऱ्यात झुडुपांमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचे निष्पन्न झाले

या प्रकरणात तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या आरोपीला कानपूर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. राजकुमार उर्फ प्यारेलाल चंद्रप्रकाश कुरील (वय ३२, रा. कानपूरनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे

. . घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवली.पिंपरी येथे सात वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत खून करणाऱ्या नराधमाला तीन वर्षांनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या

. मुलीचे अपहरण करून तिच्या खुनाची घटना सप्टेंबर २०१८ मध्ये घडली होती. या दोन वर्षात मुलीच्या आई – वडिलांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे शहरातील मुख्य चौकातील सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपी देखील निष्पन्न केला. त्यानंतर पोलिसांची पथके आरोपीच्या शोधात रवाना करण्यात आली. काही पथकांनी वेषांतर करून आरोपीच्या मूळ गावी, अन्य ठिकाणी अनेक दिवस शोध घेतला

. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. तरीही पोलिसांची शोध मोहीम सुरूच होती. इकडे या घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांचे काही दिवसात निधन झाले. खचलेल्या आईचा देखील काही दिवसांनी मृत्यू झाला.

राजकुमार हा फरारी होता. कानपूर नगर मधील सर्व पोलिस ठाण्यात त्याचे पोस्टर लावण्यात आले होते. कानपूर पोलिसांनी राजकुमार याला अटक केली. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांना याबाबत माहिती दिली. तात्काळ पिंपरी चिंचवड मधून चार जणांची टीम कानपूर नगर मधील साढ पोलीस ठाण्यात पोहोचली.

Latest News