बोर्डो ( बोरडॅक्स ) पेस्ट कशी बनवावी साईकृपा कृषी महाविद्यालयाची कृषिकन्या आरती सुरवसे,मयुरी वारे यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन*

सोलापूर : _ महात्मा फुले कृषिविद्यापीठ राहुरी सलग्न साईकृपा कृषी महाविद्यालय घरगाव आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हाळगाव मधील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतिम वर्षातील विध्यार्ध्यांसाठी राबवला जातो या कृषिकार्यक्रमा आंतर्गत या दोन महाविद्यालयाच्या कृषिकन्या अनुक्रमे आरती सुरवसे व मयुरी वारे यांनी भोसे तालुका करमाळा येथील शेतकऱ्यांना विविध बुरशीजन्य रोगांवर उपयुक्त अशी बोर्डो पेस्ट कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवले
तसेच बोर्डो पेस्ट चे फायदे म्हनजेच पेस्ट लावल्यास बुरशी थांबवता येते, उत्पादनाच्या व फळांच्या गुणवत्तेत वाढ होते, शेतकऱ्यांना फ्लबागेतून चांगला नफा मिळू शकतो, असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी साईकृपा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एच निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. ए. शिंदे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एस. बंडगर व वनस्पती रोगशास्त्र विभागप्रमुख नेवसुपे सर यांचे मारदर्शन लाभले, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद आहिरे, आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले