भाजपच्या काळातील स्थायी समिती अध्यक्षाची ACB नें चौकशी करावी : सामाजिक कार्यकर्ते बाळा साहेब वाघेरे

पिंपरी,( प्रतिनिधी):- 2017 च्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्र भरताना आता पर्यंत झालेल्या सर्व स्थायी समिती अध्यक्षांनी संपत्तीचा लेखाजोखा दिला आहे त्यानंतर संपत्तीत किती बेहिशोबी मालमत्ता झाली त्यांच्या कुटुंबाच्या व निकटवर्तीय नातेवाईक यांच्या संपत्तीची चौकशी करावी. व दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पिंपरी गावचे सामाजीक कार्यकर्ते बाळासाहेब बबन वाघेरे यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात भाजपाला आणखी एक धक्का,स्थायी समिती विद्यमान अध्यक्ष अॅड.नितीन लांडगे यांच्या अडचणीत भर ,व माजी अध्यक्ष सीमा सावळे,ममता गायकवाड,विलास मेडिगिरी,संतोष लोंढे यांनाही अडचणीत भर पडणार हे निश्चित
, ,सामाजीक कार्यकर्ते बाळासाहेब बबन वाघेरे यांनी मुख्यंमंञी उद्धव ठाकरे,उपमुख्यमंञी अजित पवार,महापालिका आयुक्त राजेश पाटील,लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पुणे(ACB) ला निवेदन देऊन कारवाई ची मागणी केली आहे
पिंपरी-चिंचवड महापालिकेत 2017च्या निवडणुकीत भाजपची एक हाती सत्ता आली आणि पहिल्या स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे झाल्या, त्यानंतर खऱ्या अर्थाने महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू झाला ठेकेदारांकडून जास्त प्रमाणात टक्केवारी मागितली जाऊ लागली
. काही ठेकेदारांकडून भागीदारी घेण्यात आली याची तक्रार त्यावेळेस प्रमोद साठे नामक व्यक्तीने थेट पंतप्रधान कार्यालयात केली होती. वर्तमानपत्रात सुद्धा बातम्या आल्या मात्र केंद्रात राज्यात व महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने चौकशी काही झाली नाही.
त्यामुळे महापालिकेत भ्रष्टाचाराची रीग मोठ्या प्रमाणात वाढली.
आता 2021ला भाजपच्या पापाचा घडा भरला व लाच घेताना स्थायी समितीचा लिपिक पकडला गेला. स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांना अटक झाली त्यामुळे स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सीमा सावळे, ममता गायकवाड, विलास मडिगेरी, संतोष लोंढे व विद्यमान अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांच्या संपत्तीची त्यांच्या कुटुंबाची व निकटवर्तीयांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करा,