निवडणुकीच्या तोंडावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा…

Chandigarh: Punjab Chief Minister Captain Amarinder Singh addresses a press conference in Chandigarh, on May 23, 2019. (Photo: IANS)

मी माझ्या वडिलांबरोबर राजभवनात जात आहे. माझे वडील राज्यपालांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपुर्द करतील. आम्ही सर्वच कुटुंबीय एक नवी सुरुवात करू, असंही कॅप्टन अमरिंदर यांचे चिरंजीव रनिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. पंजाबमधील मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपला राजीनामा दिल्याचं समजत आहे. याबाबत त्यांचे पुत्र रनिंदर सिंह यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग आपल्या पक्षामधील सतत असंतोषामुळे आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं रनिंदर सिंह यांनी म्हंटल आहे. शनिवारी पंजाबच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र त्या अगोदरच मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या समर्थक आमदार आणि मंत्र्यांसोबत बैठक घेतली. यानंतर त्यांनी राजभवन गाठून राजीनामा पत्र सादर केल्याची माहिती समजत आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपला राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सुनील जाखड यांच्या खांद्यावर द्यावी अशी मागणी अनेकांनी केल्यानं त्यांचं नाव सध्या आघाडीवर आहे.