धक्कादायक : पिंपरीत दिराने केला भावजयीचा खून

पिंपरी : पिंपरी-चिंचवडजवळील घोराडेश्वर येथे एका दिराने भावजयीचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. भावजयीकडे आरोपी दिराने शरीर सुखाची मागणी केली होती. त्याला विरोध केल्याने तिचा गळा दाबून खून केला असल्याचं उघड झाल आहे. मिताली सोमनाथ दडस (१९) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तुकाराम कोंडीबा दडस याला तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत
आरोपी तुकाराम दडस याचे मितालीशी एकतर्फी प्रेम होते. रविवारी तुकाराम दडस मितालीला घेऊन घोराडेश्वर येथे देवदर्शनासाठी डोंगरावर गेला होता. मितालीला पुढे घडणाऱ्या घटनेची काहीच कल्पना नव्हती. निर्मनुष्य आणि दाट झाडीत गेल्यानंतर आरोपीने मितालीकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र, त्याला मितालीने विरोध केला. याचाच राग मनात धरून तुकाराम दडसने मितालीचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून केला
दरम्यान, सोमवारी मयत मिताली यांचे पती सोमनाथ यांनी पोलिसात येऊन चुलत भावाने मितालीसोबत घातपात केला असल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. तेव्हा, त्यानेच मितालीचा खून केला असल्याचं उघड झाले. याप्रकरणी आरोपी तुकाराम दडस याला तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.