सिरींज अभावी लसीकरण थांबल,पालिकेचा भोंगळ कारभार


पुणे अ दर्जाची महापालिका, जिचं बजेट 8 हजार कोटी आहे,भौगोलिकदृष्ट्या महापालिका मोठी आहे, आज तिच्याकडे सिरींज नसावी. त्या अभावी लसीकरण बंद पडणं निश्चित पुण्यातील सत्ताधाऱ्यांना शोभणारं नाही. पालिकेत सत्ताधारी असणाऱ्या महापौर, चेअरमन, आणि सभागृह नेत्यांना याची कल्पना नव्हती का ?, असा सवाल जगताप यांनी केलाय.
कोरोना लसीकरण सिरींज अभावी रखडल्याचा प्रकार पुण्यात घडल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. यांनी कोरोना लसी उपलब्ध होऊन केवळ सिरींज अभावी लसीकरण रखडणं ही पालिकेचा भोंगळ कारभार दाखवणारी घटना आहे, असं म्हटलंय. राज्यातील मोठ्या महानगरपालिकांपैकी एक महापालिका असणाऱ्या अ दर्जाच्या पुणे महापालिकेकडे 1.50 रुपयांची सिरींज नसावी यापेक्षा दुर्दैव काय असावं ?, असा सवाल प्रशांत जगताप यांनी केला आहे.
पुण्यातील सत्ताधारी भाजपनं गेल्या साडे चार वर्षात कोणतंही चांगलं काम केलंलं नाही. येत्या काळात पुणेकर यांना चांगली सुबुद्धी देतील, असं प्रशांत जगताप म्हणाले आहेत. आतापर्यंत कोणतचं चांगलं काम यांनी केलेलं नाही. पुणेकर यांना चार महिन्यात बदलून दाखवतील, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील सत्ताधारी भाजपकडून सगळा भोंगळ कारभार सुरु आहे. आम्ही पुण्यात सेल्फी विथ खड्डे ही स्पर्धा घेतली होती. ही बाब पुणेकरांना कळू नये म्हणून घाई घाईनं खड्डे बूजवायला सुरुवात केली. शहरात सगळीकडे यांच दुर्लक्ष आहे अ दर्जाच्या महापालिकेचा सगळा भोंगळ कारभार चाललाय,असा आरोप जगताप यांनी केलाय.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभार रचना जाहीर होताच प्रत्येक पक्षानं आतापासूनच कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेनंतर संपूर्ण राज्याचं लक्ष हे पुणे महापालिकेकडे लागलं आहे. यंदा पुण्यात भाजपा आणि मनसे युती करावी अशी चर्चा मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यावरूनच पुण्यात सत्ताधारी भाजपा आणि मनसे एकत्र निवडणूक लढवतील. तशी विनंती आम्ही राज ठाकरे यांच्याकडे करु असं मनसे पदाधिकारी सांगत होते. असं असतानाच राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तुर्तास तरी युतीच्या चर्चा थांबवा. वेळ बघून निर्णय घेऊ, असं सांगत पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर येण्याचं नियोजन केलं आहे. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर असणार आहेत.