राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे महिलांच्या कॅन्सर व नाक कान घसा चे मोफत तपासणी शिबीर संपन्न

लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर अँड रीसर्च सेंटर चिंचवड पुणे, मिशन फाॅर व्हीजन फौडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या सयुंक्त विद्यमाने घरकुल येथे महिलांच्या कॅन्सर व नाक कान घसा या बाबत मोफत तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबिरात जनरल तपासणी स्तनांची तपासणी (IBE) गर्भाशय मुखाची तपासणी (HPV) करण्यात आली. या शिबिरात एकुण ६२ महिलांनी सहभाग घेतला होता. शिबीराचे उद्घाटन माधव धनवे पाटील शहर अध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघ पिंपरी चिंचवड, राष्ट्रवादी पदवीधर संघ उपाध्यक्ष अंबादास बेळसांगविकर पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराला संस्थेचे अध्यक्ष सहदेव गोळे, खजिनदार तानाजी कसबे, प्रयास संस्थेच्या डॉ. तृप्ती धारपवार, सीमा कंद, योगीनी थोरात, कविता शेळके आदी उपस्थित होते.

Latest News