थेरगांवमधील रुग्णालयाला भारतरत्न डॉ आंबेडकर यांचे नाव द्यावे : सामाजिक कार्यकर्ते बाबर शेख

, पिंपरी : -चिंचवड : थेरगांव येथील नवीन रुग्णालयाला भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबर चांद शेख* यांनी पालिका आयुक्ताकडे केली आहे
, थेरगांव येथील नवीन रूग्णालयाला *भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे थेरगांव येथे महानगरपालिकेच्या एकाही वास्तूला मिळकतींना डॉ .बाबासाहेबांचे नाव नाही . थेरगांव मध्ये मोठया प्रमाणात दलित , मागासवर्गीय , ओबीसी , मुस्लीम समाज राहतो त्यामुळं तात्काळ नवीन रुग्णालयाला डॉ आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे
. त्यामुळे महापालिकेच्या थेरगांव येथील नवीन रूग्णालयाला एखादया गल्ली बोळातल्या नेत्याचे नाव देण्यापेक्षा महापुरूष भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे . जेणे करून महापुरुषांची आठवण स्मरणात राहिल . म्हणून आयुक्त साहेब आपण थेरगांव येथील महापालिकेच्या नवीन रूग्णालयाला भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबर चांद शेख* यांनी पालिका आयुक्ताकडे केली आहे