खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना मिळते आंतरराष्ट्रीय कीर्ती

खडकी : मुलांनी एखाद्या क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य मिळवायला पाहिजे. खेळामध्ये उत्कृष्ठ यश मिळणाऱ्यांना समाजात, देशात आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती देखील मिळवता येते असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री मदन कोठुळे यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या वतीने ६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पत्रकार, खेळाडू खेळाडूंचे सत्कार करण्यात आले, यावेळी कोठुळे बोलत होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना बुद्धभूषण गौरव सन्मान २०२१ शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमात आरती मेस्त्री (पत्रकार सकाळ), अमोल सहारे (पत्रकार पुढारी), गणेश कांबळे (सा. कोकणचा आवाज), विक्रांत रणसिंग, गिरीश बागूलकोटकर यांना गौरवण्यात आले. कार्यक्रमात राजू मासूळकर आणि अस्मिता कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विशाल महाजन, ज्ञानेश्वर कोळेकर, देवांग कांबळे, तनिष्का कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.