चिराग पासवान यांच्या वाढदिवसानिमित्त केक वाटप

चिराग पासवान यांच्या वाढदिवसानिमित्त केक वाटप
पुणे : राष्ट्रीय अध्यक्ष खा. चिराग पासवान यांचा वाढदिवस पुण्यात लोकजनशक्ती पार्टी कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. साधू वासवानी चौकातील कार्यालयात केक कापून केकचे वाटप करण्यात आले.
यावेळी पुणे शहर – जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट , महाराष्ट्र प्रदेश सचिव अमर पुणेकर , पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस के.सी.पवार ,संघटक आप्पा पाटील , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकल सोनवणे , महिला आघाडी सरचिटणीस कल्पना जगताप, प्रमुख सल्लागार विनोद धिवार, लिगल सेल अध्यक्ष ऍड. अमित दरेकर , युवा अध्यक्ष शुभम आल्हाट, युवा उपाध्यक्ष राहुल कुलकर्णी उपस्थित होते…..
.