डॉ.आंबेडकर एक धग-धगता ज्वालामुखी :-डॉ उत्तम दादा राठोड.


डॉ.आंबेडकर एक धग-धगता ज्वालामुखी:-डॉउत्तम दादा राठोड. *** 6 डिसेंबर 1956 अर्थात महामानवांचा”महापरिनिर्वाण दिन” महापरिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे प्रमुख तत्व आणि ध्येय आहे.शब्दश: मृत्युनंतरचे निर्वाण असा होतो.बौद्ध धर्मानुसार जो “निर्वाण”प्राप्त करतो.तो संसारिक वासना,आणि जीवनातील वेदनेपासून,आणि जीवनाच्या चक्रातून मुक्त होईल. म्हणजेच तो पुन्हा-पुन्हा जन्म घेणार नाहीअसा होतो.ज्या व्यक्तीस, भारतासारख्या”सुसंस्कृत” देशात शाळेच्या आत मध्ये प्रवेश नाकारला.एवढेच नाही तर सार्वजनिक पाणवठ्यावर कुत्री, मांजरं,ढोर,पाणी पितात त्या पाण्याला स्पर्श सुद्धा करण्यास येथील संस्कृतींनी मनाई केली होती.अशा एकच नाहीतर अनेक संकटांचा सामना करून. सर्वसामान्यांचा अर्थात,दलित शोषित,पीडित,वंचित,व सर्व जाती,धर्म, पंथ,याला एक सुत्री बंधनात बांधून,न्याय,समता, स्वातंत्र्य,बंधुत्व,व सार्वभौमत्व ह्या पंचसूत्रीचा समावेश करुन भारताचे संविधान लिहिले.डॉ. आंबेडकर यांना या देशात पुस्तक वाचण्याची मुभा नव्हती.तीच व्यक्ती या भारत देशाचे अमूल्य असे भारतीय संविधान लिहून या भारत भूमीवर एवढे मोठे उपकार करून गेला.आज रोजी कोणीही भारतरत्न झाले.तर त्याची तुलना बाबासाहेबांशी कराल.पण हे चुकीचे ठरेल.?कारण बाबासाहेब हे भारतरत्न एवढ्या पुरतेच मर्यादित नसून.त्यांना साऱ्याविश्वाने विश्वाचे रत्न म्हणजे “विश्वरत्न”म्हणून ओळखले.हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. हजारो संकटे आली तरी भिम कधी झुकलाच नाही..!राहिला उपाशी पोटी पण कधी हिरमुसलाच नाही..!अरे भीम जसा शिकला तसा आजवर कोणी शिकलाच नाही..! म्हणूनच तर कोणी,मायचा लाल..!माझ्या भीमा पुढे टिकलाच नाही..! विश्वरत्न,भारतरत्न,भारतीय घटनेचे शिल्पकार,महामानव, क्रांतीसुर्य,उद्धारकर्ते,परमपूज्य, बोधिसत्व,डॉ.बाबासाहेब आंबेडकर.यांना त्यांच्या “महापरिनिर्वाण दिनानिमित्त” “गायत्री फाउंडेशन”दिग्रस च्या वतीने विनम्र कोटी-कोटी,अभिवादन..!🙏💐🙏💐🙏💐🙏