डॉ. शिलवंत यांचा वसा डॉ.सुलक्षणा जोपासतेय याचा अभिमान : आचार्य रतनलाल सोनग्रा लातूरला नवव्या अशोक स्तंभाचे लोकार्पण


पानगाव | प्रतिनिधी
डॉ. अशोल शिलवंत यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे. नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत- धर हा सामाजिक कार्याचा वसा पुढे चालवीत आहेत. त्यामुळेच वडिलांच्या पश्चात त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करीत आज ९ व्या अशोक स्तंभाचे लोकार्पण होत आहे. याचा अभिमान वाटतो, अशा भावना आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी व्यक्त केल्या.
पानगाव (ता. लातूर) येथे डॉ. अशोक शिलवंत यांच्या संकल्पनेतून नववा अशोक स्तंभ उभारला आहे. याच ठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या अस्थि स्थापित आहेत. या अशोक स्तंभाचा लोकार्पण सोहळा अशोक सर्वांगीण सोसायटी, पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने महापरीनिर्वाण दिनी पार पडला. यावेळी सोनग्रा बोलत होते. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कृत करण्यात आले.
कार्यक्रमासाठी महाविहार धम्म केंद्र सातकणीनगर, लातूरचे पूज्यभन्ते पय्यानंदजी, आचार्य रतनलाल सोनग्रा, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, त्र्यंबक भिसे,रेना सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, यशवंतराव पाटील, संतोष नागरगोजे, सदस्य सुरेश लहाणे, चंद्रचूड चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक संस्थापक अध्यक्ष व्ही के आचार्य, नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत धर, वैभव आचार्य, अॅड. राजरत्न शिलवंत आदी उपस्थित होते.
आग्रा येथील सहाव्या धम्मसंगितीचे अध्यक्ष आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अहमदनगर पाणी पुरवठा विभागाचे अभियंता परिमल निकम यांना अशोक भूषण पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मणियार, जब्बार अहेमद शेख यांना अशोक मित्र पुरस्कार, सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी सतीश गायकवाड, कलावतीबाई महादू आचार्य, कालिंदा उमाकांत किवंडे यांना संघमित्रा पुरस्कार, गायक पवन घोडके, नंदू धोंडिबा खंडागळे यांना अशोक सांस्कृतिक सेवा पुरस्कार, कवी अरुण पवार यांना अशोक काव्यभूषण पुरस्कार, शरण शिंगे, तुकाराम लामतुरे, मयूर विजयकुमार बनसोडे यांना धम्मसेवक पुरस्कार, विशाल कांबळे, बापू गायकवाड, डी एस नरशिंगे यांना महेंद्र पुरस्काराने गौरविण्यात आले.