मोटार वाहन कायद्यात नव्या सुधारणांमुळे दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ…


पुणे : मोटार वाहन कायद्यात केलेल्या नव्या सुधारणांमुळे दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ झाली आहे. मात्र यापूर्वी दंड झालेल्या रक्कमा भरल्या नसतील तर जुन्या दंडाच्या रक्कमाही नवीन सुधारणानुसार भारावल्या लागणार आहेत. याचा वाहन चालकांना मोठा भुर्दंड बसणार आहे. नवीन दंडाची रक्कम ही जुन्या दंडाच्या रक्कमेच्या तुलनेत दहापट या अधिक आहे. वाहनावरील दंड जेव्हा भरला जातो तेव्हा अस्तित्वात असलेली दंडाची रक्कम ग्राह्य धरली जाते.

जुने दंडच ग्राह्य धरले जावे असा तूर्त तरी सरकारने आदेश दिला नाही. त्यामुळे नवीन दंडच आकारला जाईल असे पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी सांगितले. नव्या नियमानुसार वाहन चालकांना भरावी लागणारी दंडाची रक्कम आधिक आहे. मात्र जुन्या दंडाची रक्कम नवीन नियमानुसार भरण्याला वाहनचालकांचा आक्षेप आहे.

नवीन नियमानुसार दंडाची रक्कम दहापट अधिक आहे. त्यामुळे दंड जुना, भरपाई मात्र नवी अशी परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे.तर दुसरीकडं नवीन दंडाच्या नियमाचा आदेश राज्याच्या परिवहन विभागाने १ डिसेंबर रोजी आदेश काढले आहे. त्यानुसार १ डिसेंबरपासूनच राज्यात मोटार वाहतुकीचे नवे कर लागू झालेत परंतु हतूक पोलिसांना अद्याप यासंदर्भातले आदेश प्राप्त न झाल्याने त्याची अंमलबाजवणी सुरू झाली नाही

.यामुळे दोघांच्या बोलण्यात संभ्रम आढळून येत आहे. हजारो पुणेकरांच्या वाहनावर असलेल्या विविध प्रकाराच्या दंडाच्या रक्कमा जुन्या चालनानुसार आहेत. मात्र त्या रक्कमा आता नवीन नियमानुसार भराव्या लागणार आहेत. दंडाच्या ई-प्रणाली अद्यायावत करण्याचे काम सुरु आहे. ते पूर्ण झाले की नवीन नियमानुसार दंड भरावा लागणार आहे.

Latest News