राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे या एस टी कर्मचाऱ्यांच्या मागणीस जाहीर पाठींबा – डाँ.भारती चव्हाण

राज्य परिवहन महामंडळ हा एक शासनाचाच विभाग असुन या शासकीय महामंडळावर अध्यक्ष उपाध्यक्ष हे सत्ताधारी पक्षाचेच नेते असतात. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची नैतिक जबाबदारी ही शासनाचीच आहे.चाळीस दिवसांपासुन आपल्या न्याय हक्कासाठी संप करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांच्या समस्या न सोडवता कारवाई ची भाषा बोलणाऱ्या परिवहन मंत्री यांंचा राजीनामा मागितला पाहिजे असे मत गुणवंत कामगार कल्याण मंडळ च्या अध्यक्षा डाँ.भारती चव्हाण यांनी संपास पाठिंबा देतांना व्यक्त केले .गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे कार्यकारीणी सदस्य यांचेसह वल्लभनगर एस टी डेपो समोरील एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन स्थळी भेट देऊन त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले व
परिवहन मंडळ राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीस व त्यासाठी केलेल्या संपास जाहीर पाठींबा देत असल्याचे म्हटले आहे.या प्रसंगी अध्यक्षा डाँ.भारती चव्हाण यांचेसह गुणवंत कामगार कल्याण मंडळचे राज्यस्तरीय उपाध्यक्ष श्री तानाजी एकोंडे,सचिव श्री राजेश हजारे ,खजिनदार श्री भरत शिंदे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री बशीर मुलाणी खजिनदार श्री चंद्रकांत लव्हाटे शहर कार्यकारीणी सदस्य श्री भरत बारी गुणवंत कामगार श्री महेंद्र गायकवाड,,श्री भगवान पाटील व श्री रघुनाथ फेगडे इ.उपस्थित होते…
या वेळी असेही ठरले आहे की,या कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे, त्यांचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.आता तर त्यांची उपासमार सुरू झाली आहे.त्यासाठी त्यांना अन्नधान्याच्या स्वरूपात मदत करणे गरजेचे आहे.मानवी संबंधाच्या दृष्टिकोनातून हे आपले कर्तव्य आहे.तरी आपल्यासारख्या दानशुरांनी पुढे येऊन यथाशक्ती मदत करावी.ती पैशाच्या स्वरूपात असेल किंवा गहू, ज्वारी, तांदूळ,तेल,साखर, डाळ अशा प्रकारच्या वस्तूच्या स्वरूपात असेल.
हे सर्व धान्य एकत्र करून ते वल्लभनगर येथील ( संपात सहभागी असलेल्या) एस टी कर्मचाऱ्यांच्या सर्व कुटुंबांमध्ये समान वाटप करण्यात येणार आहे. तरी कृपया ज्यांना अशी मदत करण्याची इच्छा आहे,त्यांनी आम्हाला फोन करून संपर्क साधावा.आम्ही गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे कार्यकर्ते ते साहित्य जमा करण्यास तत्पर आहोत, किंवा आमच्या राहत्या घरी जमा केले तरी चालेल.