छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी आदर्श:.मुख्यमंत्री बोमय्या


शिवाजीराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर सीमाभागासह महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याऐवजी कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बोमय्या यांनी पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असल्याचे वक्तव्य केल्याने वातावरण तापले. दरम्यान, यावेळी शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना देण्यात आल्या. आता कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले
. छत्रपती शिवाजी महाराजमाझ्यासाठी आदर्श आहेत. काही समाजकंटकांकडून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न होत आहे. भाषा आणि इतर मुद्द्यावरून हे लोक फूट पाडत आहेत. लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही. त्यावर कठोर कारवाई करू. हे सर्व समाजकंटक आहेत. कारण मी सर्व देशभक्तांचा आदर करतो. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कुणालाही दुखावलेलं नाही. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा प्रयत्न नाही, ते माझ्या रक्तातच नाही
. छत्रपती शिवरायांचा, सांगोली रायन्ना अशा देशभक्तांचा आदर केला पाहिजे हे आमच्या सरकारचं धोरण आहे आणि त्यावर ठाम आहोत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडला. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या घटनेवर वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे या वक्तव्याचाही तीव्र निषेध व्यक्त केला जातो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून, अशा छोट्या गोष्टींसाठी दगडफेक करणे चुकीचे असल्याचे मत बसवराज बोमय्या यांनी व्यक्त केले होते. यावरून त्यांच्यावर टीका होत आहेत. मात्र त्यांनी याबाबतीत वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे
दरम्यान, या घटनेत दुही निर्माण करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होईल असेही ते म्हणाले आहेत. काही सुत्रांनुसार या घटनेशी संबंधित २७ लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे. प्रत्येक समाजाचे नेते आणि दैवतांचा आदर करणे हे प्रत्येत नागरिकांचे कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले आहेत